परक्युटेनियस डिस्क शस्त्रक्रिया मणक्याच्या गुंतागुंतीच्या समस्येसाठी एक नवीन दृष्टीकोन
नागपूर:वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूर,अपेक्षित मार्गाच्या पलीकडे जात-वोक्हार्ट मार्गाने,रुग्णांना त्यांच्या मणक्याशी संबंधित समस्यांबद्दल काळजी न करण्याची खात्री देतात , कारण प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नवीन युगात, मणक्याच्या बहुतेक शस्त्रक्रिया की-होल पध्दतीच्या माध्यमातून केल्या जाऊ शकतात. डॉ प्रियेश ढोके, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरचे वरिष्ठ सल्लागार स्पाइन सर्जन, या क्षेत्रातील तज्ञ आहेत.
वोक्हार्ट हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार स्पाइन सर्जन डॉ प्रियेश ढोके म्हणाले, “पाठदुखी आणि पाय दुखणे (रेडिक्युलोपॅथी) असलेल्या रुग्णाचे निदान एक्स-रे आणि एमआरआय स्कॅनद्वारे केले जाते. जर एमआरआय मध्ये मज्जातंतूच्या मुळांच्या संकुचिततेसह लक्षणीय डिस्क प्रोलॅप्स दिसून येते ज्यामुळे पाय दुखणे, बधीरपणा आणि पाय अशक्त होणे हि लक्षणे दिसली तर , आमच्या उपचार योजनेनुसार प्रथम आम्ही आमच्या प्रोलॅप्स इंटरव्हर्टेब्रल डिस्क रूग्णांसाठी मर्यादित हालचाल, औषधे आणि फिजिओथेरपीसह पुराणमतवादी दृष्टिकोन स्वीकारतो . जर वेदना समस्येचे निराकरण झाले नाही किंवा रुग्णाच्या पायात कमकुवतपणा, लघवी किंवा शौचालयाच्या तक्रारी असतील तर मिनिमली इनवेसिव्ह/कीहोल शस्त्रक्रिया,( एमआयएसएस) लहान ट्यूब्स च्या मदतीने परक्यूटेनियस शस्त्रक्रिया केली जाऊ शकते”
डॉ. प्रियेश ढोके, जे स्वतः 2012 पासून हे एमआयएसएस करत आहेत ते पुढे म्हणाले की, “या एमआयएसएस चे फायदे म्हणजे अचूकता, कमीतकमी त्वचा कापणे , कमी टिश्यू डिसेक्शन त्यामुळे टिशूला कोणताही कट किंवा नुकसान होणार नाही, रक्ताची हानी कमी होते , शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी झाल्यामुळे वेदनाशामकांचा कमी वापर, रुग्ण शस्त्रक्रियेनंतर 4-6 तासांत चालू शकतो, दुसऱ्या दिवशी आंघोळ करू शकतो आणि त्याला ४८ तासांच्या आत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो. डॉ. ढोके म्हणाले, "या प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा रुग्णांना होणारा फायदा तुम्ही मोजू शकत नाही, कारण रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद पाहून, तुमच्या कामाचे फळ मिळाल्याचे समाधान अवर्णनीय आहे.”
डॉ. प्रियेश ढोके यांना ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया येथील एओ स्पाइन इंटरनॅशनल स्पाइन सेंटर येथे क्लिनिकल फेलो म्हणून आणि सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये मिनिमल इनवेसिव्ह स्पाइन सर्जरीसाठी सर्वोत्तम केंद्रांपैकी एक येथे प्रशिक्षित आहेत आणि त्यांनी त्यांचे संशोधन कार्य आणि एमआयएसएस चे परिणाम पीअर रिव्ह्यू केलेले इंटरनॅशनल स्पाइन जर्नल मध्ये सादर केले आहेत .
डॉ. प्रियेश ढोके म्हणतात ही परक्युटेनियस स्पाइन शस्त्रक्रिया अत्यंत कुशल टेक्निक आहे आणि रुग्णासाठी खूप फायदेशीर आहे. डॉ. ढोके हे अनेक आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले फेलोशिप प्रशिक्षित स्पाइन स्पेशालिस्ट आहेत आणि रुग्णांसाठी वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर येथे उपलब्ध आहेत.
0 Comments