Ticker

Proud India News चैनल देश की शान, सच्ची और निष्पक्ष खबरों का मंच। यहां लोगों की समस्या, विकास और प्रेरणा से जुड़ी हर खबर को प्रमुखता दी जाती है। प्राउड इंडिया का लक्ष्य है आपके गर्वित भारत की आवाज़ को हर कोने तक पहुंचाना।

Ad Code

Responsive Advertisement

आकाश बायजू’ज च्या सदर, नागपूर येथील नव्या क्लासरूम सेंटरचे उद्घाटन; स्थानिक विद्यार्थ्यांना देणार थेट आणि हायब्रिड क्लासेसची सुविधा; शहरातील तिसरे केंद्र

 आकाश बायजू’ज च्या सदर, नागपूर येथील नव्या क्लासरूम सेंटरचे उद्घाटन; स्थानिक विद्यार्थ्यांना देणार थेट आणि हायब्रिड क्लासेसची सुविधा; शहरातील तिसरे केंद्र

शहरातील मोक्याच्या ठिकाणी ५०१९ चौरस फूटांच्या क्षेत्रावर उभारलेल्या या केंद्रामध्ये ७ वर्गखोल्या; एका वर्षात १०००+ शालेय विद्यार्थी आणि NEET, JEE, ऑलिम्पियाड स्पर्धकांना शिकवणी देण्याची क्षमता 

कनेक्टेड आणि स्मार्ट क्लासरूम्सची सुविधा असलेल्या या सेंटरमधून लाइव्ह ऑनलाइन लेक्चर्स आणि वेबिनार्ससह ब्लेंडेड/हायब्रिड अभ्यासक्रम शिकवता येणार

नागपूर, २९ मार्च २०२३ : परीक्षांची तयारीसाठीची भारतातील अग्रगण्य सेवा आकाश बायजू’ज ने नागपूर शहरातील आपल्या NEET, IIT, JEE, ऑलिम्पियाड शिकवण्या आणि फाउंडेशन कोर्सेसना असलेल्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत सदर, नागपूर येथे आपले नवीन क्लासरूम सेंटर सुरू केले आहे. आकाश बायजू’ज च्या शिकवणी वर्गांच्या संपूर्ण देशभरात विस्तारत असलेल्या नेटवर्कमध्ये सध्या २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ३२५ हून अधिक केंद्रांचा समावेश असून त्यात आता या नव्या केंद्राची भर पडली आहे. विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणापर्यंत एक प्रमाण थेट शिकवणी सेवा पोहोचविण्याप्रती संस्थेची बांधिलकीच या विस्तारातून प्रतिबिंबित होत आहे. 

आकाश बायजू’ज, श्री राम श्याम टॉवर, चौथा मजला (LIC चौक), किंग्जवे, सदर नागपूर या मोक्याच्या ठिकाणी ५०१९ चौ. फूटांच्या जागेवर उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये ७ वर्गखोल्या आहेत आणि १०००हून अधिक विद्यार्थ्यांचे थेट शिकवणी वर्ग घेण्याची सोय आहे. कनेक्टेड आणि स्मार्ट क्लासरूम्स असलेले हे केंद्र आपल्या हायब्रिड विद्यार्थ्यांनाही एक अखंडित अध्ययनाचा अनुभव पुरवू शकते. आकाश बायजू’ज चे नागपूरातील हे तिसरे केंद्र आहे. इतर दोन केंद्रे लॉ कॉलेज चौक आणि भांडे प्लॉट चौक येथे आहेत. 

सदर, नागपूर येथील नवीन केंद्राचे उद्घाटन आकाश बायजू’ज चे रिजनल डायरेक्टर श्री. अमित सिंग राठोड यांच्या हस्ते आणि कंपनीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले.  

प्रवेशासाठी विद्यार्थी आपली गुणपत्रिका सादर करून आणि संस्थेचा प्रमुख शिष्यवृत्ती कार्यक्रम असलेल्या व येत्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या आकाश बायजू’ज नॅशनल टॅलेन्ट हन्ट एक्झाम (Anthe) साठी नाव नोंदणी करून प्रवेश घेऊ शकतात आणि लगेचच अॅडमिशन टेस्ट (iACST), ACST थेट देऊ शकतात. अलीकडेच पार पडेल्या ANTHE २०२२ मध्ये नागपूरातील १५००० विद्यार्थी सहभागी झाले होते. 

नागपूरमध्ये सुरू झालेल्या या नव्या केंद्राविषयी बोलताना आकाश बायजू’ज चे सीईओ श्री. अभिषेक महेश्वरी म्हणाले, “आकाश बायजू’ज मध्ये आम्ही विद्यार्थी केंद्री शिक्षणाचा पुरस्कार करण्यावर, म्हणजेच विद्यार्थी जिथे कुठे असतील तिथे त्यांच्यापर्यंत अभ्यासक्रम घेऊन जाण्यावर आणि शिक्षण पुरविण्यावर विश्वास ठेवतो, केवळ आमच्या अभ्यासक्रमांचा दर्जा नव्हे तर तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याची पद्धत हेही आमचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे, ज्यात ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतींमध्ये योग्य समतोल साधला जातो. थोडक्यात, आम्ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल अशा दोन्ही प्रकारांतील सर्वोत्तम ते देऊ करतो, जेणेकरून त्यांना अभ्यास करण्यासाठी अधिक प्रोत्साहित करणारा अनुभव व अशा अभ्यासाचा परिणाम मिळावा व आपली उच्च शिक्षणाची स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांना मदत मिळावी.

याच मुद्दयामध्ये भर टाकत आकाश बायजू’ज चे रिजनल डायरेक्टर श्री. अमित सिंग राठोड म्हणाले, “NEET, JEE आणि ऑलिम्पियाड परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या व आमच्या शिकवणी सेवांचे मूल्य खरोखरीच जाणणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे वसतीस्थान असलेल्या नागपूरमध्ये आपले तिसरे केंद्र उघडत असल्याचा आम्हाला आनंद आहे. आमचे केंद्र मोठ्या शहरापासून कितीही दूर असले तरीही शिकवणीचा तोच दर्जा नेहमी जपला जावा याची खातरजमा करण्यासाठी आमच्या सर्व केंद्रांमध्ये प्रशिक्षित शिक्षक, मार्गदर्शक आणि समुपदेशक कार्यरत आहेत. आपल्या राहत्या ठिकाणी थेट शिकवणी केंद्र असण्याचा विद्यार्थ्यांना होणारा मोठा फायदा म्हणजे जागतिक दर्जाचे शिक्षण आता अगदी त्यांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे व त्यांना शिकवणीसाठी आपल्या पालकांपासून आणि कुटुंबापासून दूर प्रवास करण्याची गरज कधीही पडणार नाही.

आकाश बायजू’ज च्या थेट आणि ऑनलाइन क्लासरूम्सच्या माध्यमातून दरवर्षी ३.३० लाख विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना NEET, IIT-JEE, ऑलिम्पियाड्स आणि फाउंडेशन प्रोग्राम्ससाठी चांगल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणारी शिकवणी सेवा पुरविली जाते. आपली क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित ऑनलाइन कोचिंग सेवा अधिक पुढे नेतानाच, विद्यार्थ्यांना, विशेषत: द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांतील विदयार्थ्यांना सेवा पुरविण्यासाठी संस्था आपल्या प्रत्यक्ष केंद्राचे जाळे वेगाने विस्तारत आहे.

Post a Comment

0 Comments