ग्राम बेरडी येथे श्रावनी बैल पोळा कार्यक्रम अति उत्साहात संपन्न
विकास बनसोड की खास रिपोर्ट
बेरडी (छिंड़वाड़ा ): प्रतिनिधि (विकास बनसोड) : सौंसर तहसील पासुन ३ किलोमिटर अंतरावर असनारी प्रख्यात ग्राम पंचायत बेरडी येथील बाजार चौक बेरडी तहसील सौंसर जिल्हा छिंदवाड़ा येथे दिनांक 26/ 8/ 2022 (शुक्रवारला) रोजी श्रावणी बैल पोळा मोठया प्रमानात हा भारतीय संस्कृती सण हर्षो उल्हासात एक आगळावेगळा पद्धतीने साजरा करण्यात आला.
शेतक-यांचा वर्षातूंन एक्दाच येनारा हा सन असल्यामुले उत्साह बघन्या सारखा होता सर्वप्रथम शेतक-यांनी वाजत गाजत आपल्या बैल जोडी सोबत प्रथम ग्राम दैवताच्या दर्शना साठी आनले व तोरणा खाली नेऊण सर्वांनी बेगड ,बाशिंग बांधून देवाचे फोटो व,फुगे,हार,झूला,घांग-या ,
साखळी ,नवीन एसण ,दोर,बैलांला गेरु, रंगाचे ठप्पे ,मुख पट्टी लावून मनमोहना-या अश्या एका पेक्षा एक बैल जोडी सर्व कास्तकार लोकांनी आप आपल्या बैल जोडया नटून थटून सर्वांनी आप आपल्या बैल जोड्या तोरणा खाली एकत्र केल्या होत्या ,त्यात अखाड़ा नी आपली करतब गिरि व अनेक एका पेक्षा एक करामाती खेलाचे प्रात्याक्षीत सादरीकरन केले ,फटाके फोडून हर बोला हर हर महादेव जय घोष करत सर्वानी आनंद व्यक्त करत होते
त्या नंतर संपूर्ण गावातिल शेतक-यांनी बैलाची मिरवनुक देखिल काढन्यात आली यावेळी ग्राम पंचायत बेरडी सरपंच श्रीमती संगीता अरुण गावंढे ,उपसपंच, श्री बन्डू गोविंदा गुरवे,ग्राम पंचायत सद्स्य, जनपथ पंचायत सदस्य गायत्री देवेन्द्र गायकवाड व सर्व बेरडी ग्राम वासी व गणमान्य नागरिक मोठया संखेने पोळा पाहन्यास गर्दि केली होती।
0 Comments