Ticker

Proud India News चैनल देश की शान, सच्ची और निष्पक्ष खबरों का मंच। यहां लोगों की समस्या, विकास और प्रेरणा से जुड़ी हर खबर को प्रमुखता दी जाती है। प्राउड इंडिया का लक्ष्य है आपके गर्वित भारत की आवाज़ को हर कोने तक पहुंचाना।

Ad Code

Responsive Advertisement

मेडिकल स्टोअर फोडून साडेचार लाखांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद नागपुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे

 Nagpur | मेडिकल स्टोअर फोडून साडेचार लाखांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद



नागपुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.


नागपूर : नागपूरच्या प्रसिद्ध मेयो रुग्णालयजवळ असलेल्या श्याम मेडिकल स्टोअर्स मधून पहाटेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी साडेचार लाख रुपये चोरून नेले. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. तिघेही चोरटे पहाटेच्या सुमारास दुकानाचा शटर वाकवून आत मध्ये शिरले आणि दुकानात ठेवलेले साडेचार लाख रुपये घेऊन पसार झाले. 

प्रकाश द्वारकादास कल्याणी (७१) यांचे मेयो इस्पितळाजवळ श्याम मेडिकल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. ४ जुलै रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री ११ वाजता दुकान बंद केले. रात्रभरात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. कॅश काऊंटर तोडून ९ ड्रॉवर्समध्ये ठेवलेले साडेचार लाख रुपये चोरले. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता दुकान उघडण्यासाठी कर्मचारी आले असता ही बाब उघडकीस आली.

कर्मचाऱ्यांनी तत्काळ कल्याणी यांना माहिती दिली. कल्याणी यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. सीसीटीव्हीची पाहणी केली असता तीन अज्ञात आरोपींनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांचा शोध घेण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments