Ticker

Proud India News चैनल देश की शान, सच्ची और निष्पक्ष खबरों का मंच। यहां लोगों की समस्या, विकास और प्रेरणा से जुड़ी हर खबर को प्रमुखता दी जाती है। प्राउड इंडिया का लक्ष्य है आपके गर्वित भारत की आवाज़ को हर कोने तक पहुंचाना।

Ad Code

Responsive Advertisement

गिट्टीखदानमध्ये मस्करीतून हवेत गोळीबार, चार जणांना अटक

                              Nagpur | गिट्टीखदानमध्ये मस्करीतून हवेत गोळीबार, चार जणांना अटक          

आलोक नागपुरात आला होता. पार्टी झाल्यानंतर उत्कर्षनगर वळणाजवळ रात्री इतर मित्रांसोबत त्याची थट्टामस्करी सुरू होती. यादरम्यान त्याने वळणावरच हवेत गोळीबार केला. त्यानंतर आरोपी पळून गेले.



नागपूर : गिट्टीखदान येथील ग्रीन व्हील अपार्टमेंट, उत्कर्षनगरजवळ पार्टी केल्यानंतर मित्रांसोबत मस्करी करत असताना एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली.


ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजता घडली. ही फायरिंग कुणाला टार्गेट करून केलेली नसली तरी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या घटनेत चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये आलोक अरुणकुमार शुक्ला ( ३९ वर्षे, अकोला), दीपक विद्यासागर चौधरी (४५ के.टी. नगर), राजू लक्ष्मण कडू (४३, हजारी पहाड), कार्तिकेय नरेंद्र दशसहस्त्र (३१, गणेशपेठ) यांचा समावेश आहे. परवाना असलेले पिस्तूल आलोक शुक्ला याचे आहे.

आलोक गुरुवारी नागपुरात आला होता. पार्टी झाल्यानंतर उत्कर्षनगर वळणाजवळ रात्री इतर मित्रांसोबत त्याची थट्टामस्करी सुरू होती. यादरम्यान त्याने वळणावरच हवेत गोळीबार केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. माहिती मिळताच गिट्टीखदानचे एपीआय राजेश खंदाडे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने त्यांचा जामीन मान्य केला. कडू वकील असून शुक्ला व दशसहस्त्र अशील आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Post a Comment

0 Comments