Ticker

Proud India News चैनल देश की शान, सच्ची और निष्पक्ष खबरों का मंच। यहां लोगों की समस्या, विकास और प्रेरणा से जुड़ी हर खबर को प्रमुखता दी जाती है। प्राउड इंडिया का लक्ष्य है आपके गर्वित भारत की आवाज़ को हर कोने तक पहुंचाना।

Ad Code

Responsive Advertisement

एसटी बस व ट्रकच्या धडकेत एक ठार तीन गंभीर व 27 जखमी सर्व जखमी उपचारार्थ अमरावती मध्ये रवाना चौफुलीवर स्पीड ब्रेकर देण्यासह ट्राफिक पोलीस नेमण्याची मागणी

 एसटी बस व ट्रकच्या धडकेत एक ठार तीन गंभीर व 27 जखमी सर्व जखमी उपचारार्थ अमरावती मध्ये रवाना चौफुलीवर स्पीड ब्रेकर देण्यासह ट्राफिक पोलीस नेमण्याची मागणी



एसटी बस व ट्रकच्या धडकेत एक ठार


तीन गंभीर व 27 जखमी

सर्व जखमी उपचारार्थ अमरावती मध्ये रवाना

चौफुलीवर स्पीड ब्रेकर देण्यासह ट्राफिक पोलीस नेमण्याची मागणी

नांदगाव खंडेश्वर LIVETVNEWS24 (हरीश आकरे )

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर चौफुलीवर एसटी बस आणि ट्रक यांच्यात धडक झाली व यामुळे बस चालकासह बसमधील उपस्थित प्रवासी.. जखमी झाले. तेव्हा यातील दोघांचा मृत्यू झाला असून तिन व्यक्ती गंभीर जखमी असून . 26 प्रवासी जखमी आहे. अशी माहिती या वेळी घटनास्थळाहून माहिती मिळाली


औरंगाबाद कडून नागपूर कडे जाणारा ट्रक क्र MH १६- ९७६७ व पुसद कडून अमरावती कडे जाणाऱ्या एसटी बस क्र.MH ४०-५९२६ मध्ये धडक होऊन धीम्या गतीने जाणाऱ्या बसला भरधाव ट्रकने शिंगणापूर चौफुलीवर 11 : वाजताच्या दरम्यान बसला जोरदार धडक दिली. व बसला पन्नास ते साठ फुट ट्रकने बसला फरफटत नेले व नागपूरकडे जाणाऱ्या रोड खाली धक्का दिला. यावेळी बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते. बसमधील 26 प्रवाशी जखमी असून त्या मध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. मृत व्यक्तीमध्ये पांडुरंग बोडके वय 74 वर्ष राहणार कवठा बु. मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तरी यामधील गंभीर स्वरूपाच्या जखमींना अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तर यातील जखमी प्रवासी प्रशिक खडसे पाथरड गोळे, पार्वता पोहनकर पिंपरी कलगा, मुमताज बेगम अमरावती, अरुणा अमुने पुसद, अनिकेत राठोड पुसद, कुसुम पोहणकर शिंगणापूर, प्रियंका दायमा पुसद, वनिता खडसे पाथरड गोळे, पंडित कंडेल महागाव, वनिता मेश्राम मालखेड, प्रेमदास चव्हाण वाहक, चेतन शागानी दारवा, सारिका भिडेकर बडनेरा, अश्विन जाधव पुसद, सिद्धार्थ धुळे पुसद, शालिनी गुजर नांदगाव खंडेश्वर, बाळकृष्ण काळे शेंद्री डोलारी, विजय पत्रे पुसद, तुषार भिडेकर बडनेरा, नरेश शागानी दारवा, वसंत वाहने दिघी कोल्हे, सुरेश इंगळे पुसद, साक्षी उंबरकर पुसद, यामध्ये काही प्रवाशी नेर, नांदगाव खंडेश्वर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामधील 14 प्रवासी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

तेव्हा या संपूर्ण घटनेचा पंचनामा नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन कडून करण्यात आला. व पुढील तपास ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पो. कॉ. सदाशिव देवकते, राम ढाकणे, सचिन म सांगे, निलेश करंजीकर, प्रफुल सहारे, सतीश राठोड, हे करीत आहेत

………………………………………………………..

बसमधील प्रवासी यांनी दिलेली माहिती प्रमाणे आम्ही बस मध्ये पुसद वरून अमरावती कडे जात असताना अचानक शिंगणापूर चौफुलीवर औरंगाबाद कडून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक देत बसला 50 ते 60 फूट फरफटत नेले अचानक झालेल्या घटनांमुळे आम्ही हादरलो असे प्रवाशी पंडित कंडेल महागाव जि. यवतमाळ यांनी सांगितले

…………………………………………………………

नागपूर ते औरंगाबाद या हायवेवर सिंगणापूर चौफुलीवर एकही स्पीड ब्रेकर नसल्याने दिवसेंदिवस अपघात होत आहेत त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर ची मागणी गावकऱ्यांनी केली असून येथे ट्रॅफिक पोलिसांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली नसल्याने ट्राफिक पोलीस देण्याची मागणी सुद्धा येथील गावकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments