Ticker

Proud India News चैनल देश की शान, सच्ची और निष्पक्ष खबरों का मंच। यहां लोगों की समस्या, विकास और प्रेरणा से जुड़ी हर खबर को प्रमुखता दी जाती है। प्राउड इंडिया का लक्ष्य है आपके गर्वित भारत की आवाज़ को हर कोने तक पहुंचाना।

Ad Code

Responsive Advertisement

रविवार ठरला अपघात वार; अमरावतीत दोन अपघातांत सहा ठार, चिमुकल्यासह सात जखमी

 रविवार ठरला अपघात वार; अमरावतीत दोन अपघातांत सहा ठार, चिमुकल्यासह सात जखमी



अमरावती नागपूर महामार्गासह रहाटगाव रिंगरोडवर झालेल्या दोन भीषण अपघाताच्या घटनेत सहाजण जागीच ठार तर, सातजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

रविवार ठरला अपघात वार; अमरावतीत दोन अपघातांत सहा ठार, चिमुकल्यासह सात जखमी

● प्रवासी वाहन-ट्रकची समोरासमोर धडक

● रहाटगाव रिंगरोडवरील घटना

अमरावती : रविवारचा दिवस जिल्ह्यासाठी अपघात वार ठरला. अमरावती-नागपूर महामार्गासह रहाटगाव रिंगरोडवर झालेल्या दोन भीषण अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला तर सातजण गंभीररित्या जखमी झाले. मृतांमध्ये आठवर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे.

बडनेरानजीक अंजनगाव बारीहून शिरजगाव कसब्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी चारचाकी वाहन आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात प्रवासी वाहनातील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सातजण गंभीर जखमी झाले. रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास रहाटगाव रिंग रोडवरील एका हॉटेलसमोर हा भीषण अपघात घडला. त्यापूर्वी पहाटे ४.३० च्या सुमारास मालवाहू वाहन मागून ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले. तो अपघात नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. (six killed, seven injured in two accidents in Amravati)



Post a Comment

0 Comments