सोनी सबवरील वागले कुटुंब आणि नागपूरमधील त्यांच्या चाहत्यांमध्ये धमाल क्षण
जीवनाशी संबंधित कथानकामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. सुरू झाल्यापासून या मालिकेने सामान्य व्यक्तीने संघर्ष, भारतीय घरामध्ये दिसून येणा-या सामाजिक समस्या आणि महत्त्वाकांक्षांना दाखवत टेलिव्हिजनवरील विक्रम मोडून काढले आहेत. मालिकेवर प्रेक्षकांनी केलेला प्रेमाचा वर्षाव पाहून 'वागले की दुनिया'चे कलाकार नागपूर शहराला भेट देत त्यांच्या चाहत्यांना भेटले आणि त्यांच्यासोबत धमाल क्षण व्यतित केले. सुमीत राघवन (राजेश वागले) व परिवा प्रणती (वंदना वागले) यांच्या नेतृत्वांतर्गत असलेल्या टीमचे शहरामध्ये उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले, ८० च्या दशकातील आरके लक्ष्मण निर्मित लोकप्रिय मालिकेचे आधुनिक रूपांतरण सुरू करण्यात आलेल्या या मालिकेमध्ये अंजन श्रीवास्तव (श्रीनिवास वागले) व भारती आचरेकर (राधिका वागले) हे कलाकार देखील आहेत. ही मालिका आगामी आठवड्यांमध्ये लक्षवेधक घटना सादर करण्यास सज्ज आहेत, ज्या वागलेना अस्ताव्यस्त करण्यासोबत प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीन्सबर खिळवून ठेवणार आहेत. अथर्व (शालीन कपाही) त्याचा जुळा भाऊ अभय वागलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला वाटते की त्याचे आईवडिल त्याच्यापासून मोठे गुपित लपवत आहेत. राजेशचे कामकाजाचे जीवन तणावपूर्ण आहे, जेथे त्याला अवास्तव मागणी करणा-या व विचित्र बॉसचा सामना करावा लागतो. पण वंदनाने श्रमजीवी महिला बनण्यासोबत स्वतःच्या आवडीला व्यवसायामध्ये बदलले आहे आणि तिला कुटुंबाच्या खर्चामध्ये योगदान देण्याचा आनंद होत आहे.यासह प्रेक्षकांना अधिक उत्साहवर्धक मनोरंजन मिळणार आहे, जे निश्चितच त्यांना शहरातील त्यांच्या सर्वात आवडत्या कुटुंबाकडे लक्ष वेधून ठेवेल. राजेशची भूमिका साकारणारे सुमीत राघवन म्हणाले, "एक भूमिका म्हणून राजेश माझ्यासाठी खास आहे, कारण मालिका 'वागले की दुनिया'मध्ये ही भूमिका साकारताना मला दैनंदिन जीवनातील पैलूंना सुरेख पद्धतीने सादर करण्यास मिळत आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेम व शुभेच्छांचा केलेला वर्षाव पाहून खूपच प्रेरणादायी वाटते. मला नागपूरला भेट देऊन येथील चाहत्यांसोबत गप्पागोष्टी करण्याचा आनंद होत आहे. मला या शहरामध्ये पुन्हा यायला आवडेल. आम्ही अवघड काळामध्ये मालिका सुरू केली आणि आता बाहेर पडून चाहत्यांचे प्रेम व कौतुकाची थाप पाहून खूपच उत्साहवर्धक वाटत आहे. आम्ही मालिकेमध्ये सर्वोत्तम व सर्वात संबंधित कथानक सादर करण्याचा प्रयत्न करतो. अधिक रोमांचक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. मालिका पाहत राहा आणि मी खात्री देतो की, बागले तुमचे मनोरंजन करत राहतील."
वंदनाची भूमिका साकारणा-या परिवा प्रणती म्हणाल्या, "मालिका 'वागले की दुनिया' प्रेक्षकांना सहजपणे पात्रांशी व • त्यांच्या कथांशी संलग्न करते. मालिका कथानकाच्या माध्यमातून संबंधित सामाजिक समस्यांचे निराकरण करते आणि असे सादरीकरण प्रेक्षकांना त्यावर विश्वास ठेवून त्याचा दैनंदिन जीवनामध्ये अवलंब करण्यास प्रेरित करते. वंदना ही आजची महिला आहे, जी घरातील कामे, तिचे मुलांचा सांभाळ करण्यासोबत स्वतःची आवड जोपासते. आमच्या प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम व कौतुक पाहून खूपच उत्सा
हित वाटते. मला नागपूरमध्ये येऊन चाहत्यांसोबत प्रेम वाटून घेण्याचा आनंद होत आहे." पाहत राहा 'वागले की दुनिया नये किस्से नयी पीढी' दर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त सोनी सबवर
0 Comments