प्रसिध्द डाॅक्टर पुरुष रुग्णांसोबत करायचा अनैसर्गिक संभोग.,रंगेहाथ कॅमेरात कैद
अकोला: एका प्रसिद्ध डॉक्टरनं स्वत:च्या रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.डॉ.अनंत शेवाळे असं डॉक्टरचं नाव असुन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.डॉ.शेवाळे जिल्ह्यातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ आहेत.या प्रकरणी एका स्थानिक युट्युब चॅनलच्या प्रतिनिधीनं तक्रार दाखल केली आहे.
काही दिवसांपुर्वी पीडित व्यक्तीच्या मित्रासोबत डॉक्टरनं अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.याबद्दलची सत्यता पडताळण्यासाठी तक्रारदार रुग्ण बनुन डॉक्टरांकडे गेला.त्यावेळी डॉक्टरांनी त्याचे कपडे उतरवले आणि त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. रुग्ण बनुन गेलेल्या युट्यूब चॅनलच्या प्रतिनिधीनं या घटनेचं स्टिंग ऑपरेशन केलं.
ही घटना ४ ऑक्टोबरला घडली.त्यानंतर व्हिडीओ पूराव्यांच्या आधारे तक्रारदारानं डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी डॉक्टरविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ अंतर्गत गून्हा दाखल केला आहे.
0 Comments