जेलमधील अधिकाऱ्याला शाहरूख म्हणाला, माझ्या मुलाला काहीतरी खायला देऊ का? अधिकारी म्हणाला..
जेलमधील अधिकाऱ्याला शाहरूख म्हणाला, माझ्या मुलाला काहीतरी खायला देऊ का? अधिकारी म्हणाला..
ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी शाहरुख शर्थीचे प्रयत्न करत आहे. अशाच परिस्थितीत शाहरुख खान आपल्या मुलाला आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड जेल मध्ये पोहोचला.
अटकेनंतर पहिल्यांदाच दोघांची भेट झाली. याआधी शाहरुख खानने आर्यन सोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला होता. आज सकाळी जेव्हा शाहरुख खान जेलमध्ये असलेल्या आर्यनला भेटला तेव्हा तेव्हा दोघेही भावूक झाले.
शाहरुख खान सकाळी सुमारे ९ चा आसपास आर्थर रोड जेल मध्ये पोहोचला. यावेळी जेलच्या बाहेर अनेक पोलीस, मिडिया यांची गर्दी होती. यावेळी बाहेरच शाहरूखला मिडियाने घेरले. पण शाहरुख खानने काही न बोलता मीडिया पासून बचाव करत आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूख खान आणि आर्यन दोघांमध्ये १५ मिनिटे बोलण झालं. यावेळी दोघंही एकदम भावूक झाले. भावूक झालेल्या शाहरूख खानने आपल्या मुलाला विचारलं, काही खाल्लस का? यावर आर्यनने मान हालवून नकार दिला. यावर शाहरुखने जेल अधिकाऱ्याला विचारलं की, आम्ही आर्यनला काही खायला देऊ शकतो का? यावर जेल अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोर्टाच्या आदेशानुसार त्याला बाहेरच खायला देऊ शकत नाही.
त्यानंतर शाहरुख खान ९ वाजून ३५ मिनिटांनी जेलमधून रवाना झाला. शाहरूखच्या येण्याची माहिती मिळताच जेलच्या आसपास परिसरात पोलिसांची तैनात वाढवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधील कैद्यांना कुटुंबातील परिवाराला मिळण्याची परवानगी नव्हती.
माहितीनुसार, आजच सकाळी कैद्यांना भेटण्याची परवानगी मिळाली होती, त्यानंतर शाहरुख येथे पोहोचला. NDPS च्या न्यायलयाने काल आर्यन चा जामीन अर्ज फेटाळला. कोर्टाने म्हटले होते की, प्रथमदृष्ट्या आर्यन ड्रग्स प्रकरणी सामील असल्याचे दिसून आले आहे. तसेच त्याच्या व्हॉट्सॲप चॅट वरून समजते की तो ड्रग्स पेडलरच्या संपर्कात होता.
0 Comments