जेव्हा महाराष्ट्र्राचा मुलगा शाहिद झाला पहा व्हिडीओ गर्व वाटेल
आपल्या भारत देशावर अनेक विदेशांची नजर आहे. त्यामध्ये मग आपल्या बाजूचे अनेक देश आहेत जसे कि पाकिस्तान, चीन इत्यादी. आपल्या देशाची जमीन हडपण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत परंतु आपला भारत देश सुद्धा या सर्वाना उत्तर द्यायला कमी नाही. आपल्या भारतीय आर्मीमधल्या जवानांना खूप उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते जेणेकरून युद्धकाळात कोणी डगमगू नये. जवान सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून भारत मातेसाठी लढत असतात.
देशावर अनेक दहशतवादी हल्ले केले जातात तसेच या हल्ल्यांना सामोरे जायला जवान कमी नाहीत. आज आर्मीतील जवान देशाच्या सीमेवर जिद्दीने लढत असल्यामुळे आपण रोजचे जीवन नीट जगू शकतो नाहीतर तुम्हाला कल्पना असू शकते कि आपल्या देशाची काय अवस्था झाली असती. आज असाच एका लढताना शहिद झालेल्या जवानाच्या अंत्यसंस्काराचा विडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुमचे डोळे अश्रूंनी भरून येतील.
ऋषिकेश जोंधळे असे या वीर जवानाचे नाव आहे. ऋषिकेश हे कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील होते. तुम्ही जर व्हिडिओत पाहिले तर त्यांच्या घरच्याची ते गेल्यामुळे काय अवस्था झाली आहे हे तुम्हाला समजून येईल. आई वडील बाकी सर्व नातेवाईक यांना अतिशय दुःख झाले आहे. एवढी कोरोनाची भीती असूनही तुम्ही पाहू शकता कि अंत्य संस्काराच्या वेळी हजारोने लोकांनी गर्दी केली आहे. कोणालाही कोरोनाचे भय नाही परंतु आपला एक जवान गेला याचे दुःख खूप आहे. ऋषिकेश जोंधळे यांना आपल्याकडूनहि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. जय हिंद!!
पहा व्हिडीओ :
0 Comments